वाशिम जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:29 AM2020-08-23T11:29:09+5:302020-08-23T11:29:18+5:30
आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३८१ वर पोहचली असून, यापैकी ३५८ रुग्ण अॅ्िक्टव्ह आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, २२ आॅगस्ट रोजी आणखी २९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३८१ वर पोहचली असून, यापैकी ३५८ रुग्ण अॅ्िक्टव्ह आहेत.
जून, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये २९ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील टिळक चौक परिसर १, लाखाळा परिसर २, इंगोले नगर परिसर १, जुने बाहेती हॉस्पिटलजवळील परिसर १, बाकलीवाल कॉलनी परिसर १, चंडिकावेस परिसरातील १, अनसिंग येथील २, वारा जहांगीर येथील ४, बाभूळगाव येथील २, पार्डी आसरा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४, शिवाजी नगर परिसरातील २, पोहा येथील १, पारवा येथील १, मानोरा तालुक्यातील वापटा येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, आसेगाव पेन येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान शनिवारी ३६ जणांनी कोरोनावर मात केली. झाकलवाडी १, कारंजा लाड शहरातील हयातनगर १, माळीपुरा १, कामरगाव ३, मोरंबी १, सोहळ २, पीएनसी कॅम्प आखातवाडा ५, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन ९, शिरसाळा ८, रिसोड तालुक्यातील एकलासपूर २, गोहगाव हाडे येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट आॅफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.
आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १३८१ वर पोहोचली असून, त्यातील २४ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ९९८ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३५८ रुग्णांंवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.