जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:31+5:302021-04-14T04:37:31+5:30

वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण ...

Another 296 corona positive in the district! | जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह!

जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह!

Next

वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९,६७९ वर पोहोचला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी २९६ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, बालाजी होंडाजवळील १, लाखाळा येथील ८, जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील १५, दत्तनगर येथील ४, योजना कॉलनी येथील १, मंत्री पार्क येथील १, कोल्हटकरवाडी येथील ३, आययूडीपी कॉलनी येथील ४, गजानन चौक येथील १, शेलू रोड परिसरातील १, नवीन आययूडीपी कॉलनी येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ३, माधवनगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, राजनी चौक येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ४, क्रिटिकल केअर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेशपेठ येथील १, नंदीपेठ येथील १, गव्हाणकरनगर येथील २, विनायकनगर येथील १, माऊलीनगर येथील १, ब्रह्मा येथील ३, तोंडगाव येथील २, काटा येथील ६, कार्ली येथील १, सायखेडा येथील १, सावरगाव बर्डे येथील १४, ब्राह्मणवाडा येथील १, बोराळा येथील १, अनसिंग येथील २, पिंप्री येथील १, नागठाणा येथील १, शिरपुटी येथील १, सोंडा येथील १, पिंपळगाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील ४१, कारंजा शहरातील आदर्शनगर येथील १, बंजारा कॉलनी येथील १, एम. जे. स्कूलजवळील २, शहादतपूर येथील १, कुपटी येथील १, दोनद बु. येथील १, इंझा येथील १, जयपूर येथील २, जनुना येथील १, खानापूर येथील १, कामरगाव येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, अनंत कॉलनी येथील ११, ब्राह्मणगल्ली येथील १, साई ग्रीन पार्क परिसरातील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, जयंत गल्ली येथील १, जिजाऊनगर येथील १, गैबीपुरा येथील १, मोप येथील २, नावली येथील १, चिखली येथील २८, मांगुळ येथील २, गोवर्धना येथील १५, पेनबोरी येथील १, कळमगव्हाण येथील १, केंद्रा येथील १, वाकद येथील २, घोटा येथील २, करडा येथील २, महागाव येथील १, घोन्सारवाडी येथील १, मांडवा येथील ३, गोहगाव येथील ४, मालेगाव शहरातील ३, रामनगर येथील २५, जऊळका येथील २, शिरपूर येथील २, चांडस येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजीनगर येथील १, भोयणी खदान येथील १५, उमरी येथील २, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली आहे, तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

००००

कोरोनाबाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह १९,६७९

ॲक्टिव्ह - २,४८४

डिस्चार्ज १६,९८३

मृत्यू- २११

Web Title: Another 296 corona positive in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.