वाशिम जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 06:06 PM2021-04-13T18:06:16+5:302021-04-13T18:06:23+5:30

Washim Corona News: आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

Another 296 corona positive in Washim district | वाशिम जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

२३४ जणांना डिस्चार्ज : एकूण रुग्णसंख्या १९६७९
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९६७९ वर पोहोचला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी २९६ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, बालाजी होंडा जवळील १, लाखाळा येथील ८, जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील १५, दत्त नगर येथील ४, योजना कॉलनी येथील १, मंत्री पार्क येथील १, कोल्हटकरवाडी येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील ४, गजानन चौक येथील १, शेलू रोड परिसरातील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील ३, माधव नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, राजनी चौक येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ४, क्रिटीकल केअर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेशपेठ येथील १, नंदिपेठ येथील १, गव्हाणकर नगर येथील २, विनायक नगर येथील १, माऊली नगर येथील १, ब्रह्मा येथील ३, तोंडगाव येथील २, काटा येथील ६, कार्ली येथील १, सायखेडा येथील १, सावरगाव बर्डे येथील १४, ब्राह्मणवाडा येथील १, बोराळा येथील १, अनसिंग येथील २, पिंप्री येथील १, नागठाणा येथील १, शिरपुटी येथील १, सोंडा येथील १, पिंपळगाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील ४१, कारंजा शहरातील आदर्श नगर येथील १, बंजारा कॉलनी येथील १, एम. जे. स्कूल जवळील २, शहादतपूर येथील १, कुपटी येथील १, दोनद बु. येथील १, इंझा येथील १, जयपूर येथील २, जनुना येथील १, खानापूर येथील १, कामरगाव येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, अनंत कॉलनी येथील ११, ब्राह्मणगल्ली येथील १, साई ग्रीन पार्क परिसरातील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, जयंत गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, गैबीपुरा येथील १, मोप येथील २, नावली येथील १, चिखली येथील २८, मांगुळ येथील २, गोवर्धना येथील १५, पेनबोरी येथील १, कळमगव्हाण येथील १, केंद्रा येथील १, वाकद येथील २, घोटा येथील २, करडा येथील २, महागाव येथील १, घोन्सारवाडी येथील १, मांडवा येथील ३, गोहगाव येथील ४, मालेगाव शहरातील ३, राम नगर येथील २५, जऊळका येथील २, शिरपूर येथील २, चांडस येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील १, भोयणी खदान येथील १५, उमरी येथील २, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: Another 296 corona positive in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.