जिल्ह्यात आणखी ३३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:44+5:302021-01-18T04:36:44+5:30
वाशिम : जिल्ह्यात आणखी ३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १७ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ...
वाशिम : जिल्ह्यात आणखी ३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १७ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ६,९०५ वर पोहोचली आहे. दरम्यान रविवारी पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. रविवारी ३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स येथील २, जैन कॉलनी येथील ८, सिंधी कॅम्प येथील १, आर. ए. कॉलेज जवळील ४, जनता बँक जवळील १, पोलीस वसाहत येथील २, शहरातील इतर ठिकाणचा १, श्रीगिरी येथील १, तोंडगाव येथील १, वारा जहाँगीर येथील १, मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील २, तिवळी येथील १, बोराळा खु. येथील १, बोराळा जहां. येथील १, राजुरा येथील १, रिसोड तालुक्यातील नंधना येथील २, गोवर्धन येथील १, वाकद येथील १, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,९०५ वर पोहोचला आहे.
००
१६३ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,९०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,५८९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.