जिल्ह्यात आणखी ३४ जण कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:24+5:302021-02-17T04:49:24+5:30
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहे. गत तीन ...
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहे. गत तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. मंगळवारी आणखी ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, खंबाळा येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू येथील १, रिसोड तालुक्यातील मोप येथील १, देगाव येथील २, कारंजा शहरातील बायपास परिसरातील २, हिवरा लाहे येथील १, भामदेवी येथील १, उंबर्डा बाजार येथील ७, रापेरी येथील १, पोहा येथील २, सुकळी येथील १, कामरगाव येथील १, नागलवाडी येथील २, हिवरा येथील १, धनज येथील १, मनभा येथील ३, शिवनगर येथील १, बोरवा येथील १, धामणी येथील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा ७,३७३ वर पोहचला असून, यापैकी १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ७०७४ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
०००
१४२ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,३७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ७,०७४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.