आणखी ८७ पाॅझिटिव्ह; २१ जणांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:50+5:302021-02-24T04:42:50+5:30

गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. मंगळवारी आणखी ८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये ...

Another 87 positive; 21 beat Corona! | आणखी ८७ पाॅझिटिव्ह; २१ जणांची कोरोनावर मात!

आणखी ८७ पाॅझिटिव्ह; २१ जणांची कोरोनावर मात!

Next

गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. मंगळवारी आणखी ८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील १, हरिओमनगर येथील १, नालंदानगर येथील १, देवपेठ येथील २, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील १, माधवनगर येथील १, बोराळा येथील २, ढिल्ली येथील १, जांभरूण येथील १, मालेगाव शहरातील १, बोरगाव येथील १, रिसोड तालुक्यातील नंधाना येथील २, येवता येथील ५, चिंचाबाभर येथील १, कंकरवाडी येथील १, लोणी येथील १, मोप येथील १, देगाव येथील १३, मंगरूळपीर शहरातील बाबरे ले-आउट येथील १, राधाकृष्णनगरी येथील २, मंगलधाम येथील १, चांभई येथील येथील २, चहल येथील १, चांधई येथील १, पिंप्री येथील १, मसोला येथील १, बेलखेड येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, बाबरे कॉलनी येथील १, अमर चौक परिसरातील १, जुना दवाखाना परिसरातील १, गणपतीनगर येथील १, राम मंदिरजवळील १, ममतानगर येथील १, गायकवाडनगर येथील १, वनदेवीनगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, गवळीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शांतीनगर येथील १, शिवाजीनगर येथील १, धनज येथील ९, रहाटी येथील १, बेलखेड येथील २, धामणी खडी येथील २, उंबर्डा येथील ४ तसेच कामठवाडा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता कोरोनाबाधितांचा आकडा ७,९२२ वर पोहोचला आहे. वाशिम शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढत आहे.

००००

६०३ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,९२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल ७,१६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत ६०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

००

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्धांची चाचणी

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे यासह कोरोनाविषयक लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार संदिग्ध रुग्णांचीदेखील कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत.

Web Title: Another 87 positive; 21 beat Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.