जिल्ह्यात आणखी ९३ जण कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:47+5:302021-02-21T05:18:47+5:30
वाशिम : जिल्ह्यात आणखी ९३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ७,६४८ ...
वाशिम : जिल्ह्यात आणखी ९३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ७,६४८ वर पोहोचली आहे. दरम्यान, नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. शनिवारी आणखी ९३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, काळे फाइल येथील १, अकोला नाका येथील १, सिव्हिल लाइन्स येथील १०, सुंदरवाटिका येथील २, महेशनगर येथील १, लाखाळा येथील १, महात्मा फुले चौक येथील १, सुदर्शननगर येथील २, वाल्मीकी नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील १, शुक्रवार पेठ येथील १, तोंडगाव येथील ३, तिवळी येथील १, तामसी येथील २, पार्डी टकमोर येथील ४, वांगी येथील १, मंगरूळपीर शहरातील शिंदेनगर येथील १, मानोली रोड परिसरातील १, बायपास रोड परिसरातील ३, अशोकनगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, पेडगाव येथील १, मानोली येथील ३, शेलूबाजार येथील १, सोनखास येथील २, चहल येथील १, खडी येथील १, मालेगाव शहरातील ५, मेडशी येथील १, किन्हीराजा येथील १, रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथील १, वाकद येथील १, कारंजा शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातील १, बंजारा कॉलनी परिसरातील १, भारतीपुरा येथील १, मानोरा रोड परिसरातील २, यशोदानगर येथील १, माळीपुरा येथील १, जैन मंदिरजवळील १, एसबीआय जवळील २, अंबादेवी येथील १, उंबर्डा बाजार येथील २, धानोरा ताथोड येथील ३, धमनी खडी येथील २, पोहा येथील ४, धनज येथील ३, अंतरखेडा येथील २, मानोरा तालुक्यातील दापुरा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
आता कोरोनाबाधितांचा आकडा ७,६४८ वर पोहोचला असून, यापैकी १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७१०५ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
०००
३८६ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,६४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ७,१०५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे ३८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.