वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ३४ नवे ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:30 AM2020-12-15T11:30:03+5:302020-12-15T11:30:20+5:30

Washim CoronaVirus News एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली.

Another death in Washim district; 34 new 'positives' | वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ३४ नवे ‘पॉझिटिव्ह’

वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ३४ नवे ‘पॉझिटिव्ह’

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आणखी ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. दरम्यान, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, ४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट आली होती. डिसेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. सोमवारी एकूण ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १, बागवानपुरा येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जाधव ले-आऊट येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, अनसिंग येथील ३, उकळीपेन येथील २, मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील १, सुदी येथील १, पांगरखेडा येथील १, एकांबा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, रिठद येथील १, मोप येथील १, भर येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील चहल येथील १, कासोळा येथील १, वसंतवाडी येथील १, कारंजा शहरातील सनराईज कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मनभा येथील १, शिवनगर येथील १, पोहा येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादासनगर येथील २, रोहणा येथील १, करपा येथील २, शेंदूरजना येथील १, गोस्ता येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. 
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,४४७  वर पोहोचला आहे. सोमवारी ६ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. दरम्यान, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे १४८ जणांचा मृत्यू झाला.   नागरिकांनी यापुढेही खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.


२६१ जणांवर उपचार 
जिल्ह्यात आतापर्यंत ६,४४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,०३७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी  कोविड हॉस्पिटल येथे २६१ अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.

Web Title: Another death in Washim district; 34 new 'positives'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.