वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:25 PM2018-10-29T18:25:55+5:302018-10-29T18:26:20+5:30
वाशिम : समाजातील अपप्रवृत्तींविरूद्ध धडक कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुणालाही न घाबरता या सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सर्वसामान्य जनता, डॉक्टर्स, संस्थाचालक, व्यापारीवर्ग, दवाखाने, शाळा-कॉलेज, कृषी केंद्र संचालक, शेतमालाची विक्री करणारे शेतकरी आदींना शस्त्राचा धाक दाखवून पैशांची मागणी करणाºया अपप्रवृत्ती सक्रीय आहेत. अशा लोकांना न घाबरता ‘अॅन्टी गुंडा सेल’कडे तक्रार दाखल करावी. संबंधित पिडितांना तडकाफडकी न्याय दिला जाईल, असे कळविण्यात आले आहे. यासाठी ‘अॅन्टी गुंडा सेल’मध्ये समाविष्ट पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी एस.पी. पाटील, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.