वैरण बियाणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:36+5:302021-02-07T04:37:36+5:30
.................... प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी वाशिम : कोरोनाविषयक सूचनांची सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन ...
....................
प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी
वाशिम : कोरोनाविषयक सूचनांची सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन केले जात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.
.................
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्रलंबित
जऊळका : आधार क्रमांकाशी बँक खाते क्रमांक लिंक नसल्याने जिल्ह्यातील काही अनु. जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेची रक्कम अद्याप प्रलंबित आहे.
.................
प्रशिक्षणासाठी ऑनलाइन माहिती मागविली
वाशिम : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत युवक-युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने ऑनलाइन पद्धतीने माहिती मागविली आहे.
.............
बोगस डॉक्टर शोध मोहीम थंडावली
किन्हीराजा : बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. मात्र, ही मोहीम सर्वच स्तरावर थंडावल्याचे दिसून येत आहे.
...............
रमाई आवास घरकुल अनुदान रखडले
मेडशी : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण करणाऱ्या परिसरातील सुमारे ३० लाभार्थींना तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळाले नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
................
शिक्षक पदोन्नतीसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा
मालेगाव : जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित आहे. हा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने ५ फेब्रुवारी रोजी शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
..................
शौचालय बांधकामाचा आढावा
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या शौचालय बांधकामाचा स्वच्छता मिशनच्या तालुकास्तरीय चमूने ५ फेब्रुवारी रोजी आढावा घेतला.