दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:14+5:302021-03-26T04:41:14+5:30

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ ऑगस्ट २०२० रोजी शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर ...

Appeal to avoid crowds at the secondary registrar's office | दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्याचे आवाहन

दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्याचे आवाहन

Next

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ ऑगस्ट २०२० रोजी शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ च्या खंड (बी) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी २ टक्के व १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या ते ३१ मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता १.५० टक्के कमी केलेले आहे. ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १४७ (अ)अन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार व २८ ऑगस्ट २०२१ रोजीचे शासन निर्णयान्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा १ टक्का अधिभार हा १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ० टक्का इतका तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता ०.५० टक्का इतका कमी करण्यात आलेला आहे.

शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी वाशिम येथील एकूण ६ दुय्यम निबंधक कार्यालयांत ही सवलत संपत असल्याने गर्दीची शक्यता आहे. मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम २३ अ नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च २०२१ शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता उपरोक्तप्रमाणे नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घ्यावा, तसेच शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीसुद्धा वाशिम जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीच्या कामकाजाकरिता सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कळविले.

Web Title: Appeal to avoid crowds at the secondary registrar's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.