युवा दिन ऑनलाईन साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:56+5:302021-01-10T04:31:56+5:30
..................... ‘डी.एल.एड’चे प्रवेश प्राचार्यांच्या ‘लॉगिन’मधून वाशिम : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा ऑनलाईन भरल्या ...
.....................
‘डी.एल.एड’चे प्रवेश प्राचार्यांच्या ‘लॉगिन’मधून
वाशिम : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा ऑनलाईन भरल्या जाणार असून प्रमाणपत्र पडताळणीनंतर हे प्रवेश अध्यापक विद्यालयातील प्राचार्यांच्या ‘लॉगिन’मधून केले जाणार आहेत.
....................
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत
वाशिम : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नुकसानभरपाईच्या दुसऱ्या हप्त्याचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.................
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. नियमाची अंमलबजावणी करून प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत.
................
दशरात्रौत्सवातील कार्यक्रमास प्रतिसाद
तोंडगाव : येथून जवळच असलेल्या कोकलगाव येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यालयात ३ जानेवारीपासून सुरू असलेल्या सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवांतर्गत विविध कार्यक्रम सुरू असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
.............
वळणमार्गाअभावी वाहतूक विस्कळीत
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग छेदून गेलेल्या वाशिममध्ये अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका या मुख्य चौकांमधूनच जड वाहने धावत आहेत. वळणमार्ग अद्याप निर्माण झाला नसल्याने ही समस्या उद्भवली असून वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.
...................
नुकसानीची सर्व्हे करण्याची मागणी
मालेगाव : वातावरणातील बदलाचा परिणाम होऊन तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व्हे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
..................
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दुकाने
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच किरकोळ साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. खाली बसून उघड्यावर साहित्य विक्री करण्याच्या या प्रकारामुळे रुग्णवाहिका ने-आण करताना अडथळा जाणवत आहे.
...................
अरुंद रस्त्यावरून धावताहेत वाहने
वाशिम : पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे मधला मार्ग म्हणून वाहनधारकांनी मंत्री पार्कजवळून जनता बँकेजवळ निघणाऱ्या रस्त्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, हा रस्ता अरुंद असून दुतर्फा घरे असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात सापडला आहे.
..................
१० रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची झाली सोय
वाशिम : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्याला नीती आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका मिळाल्या. यामुळे अतिगंभीर रुग्णांची सोय झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले.
....................
ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलिसांची विशेष मोहीम
वाशिम : मुले परगावी स्थायिक झाली असताना घरी एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारातून विशेष मोहीम राबविली जात आहे. अधूनमधून पोलिसांची चमू ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करीत आहे.