कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:29 AM2021-05-31T04:29:39+5:302021-05-31T04:29:39+5:30

............... गावठाण सीमा निश्चित करण्याची मागणी मालेगाव : स्वामित्व योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावठाणच्या सीमा निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

Appeal for corona vaccination | कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन

कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन

Next

...............

गावठाण सीमा निश्चित करण्याची मागणी

मालेगाव : स्वामित्व योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावठाणच्या सीमा निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. ही कार्यवाही करण्यासंबंधी मध्यंतरी प्रशासनाने मोहीम हाती घेतली होती. मात्र, काहीच कार्यवाही झाली नाही. सीमा निश्चित कराव्या, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.

............

अतिक्रमणाचे प्रस्ताव पडले धूळ खात

किन्हीराजा : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करण्याची बाब अधांतरी असून, प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून न्याय द्यावा, अशी मागणी जगदीश इंगळे, पंचफुला गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

.................

नंदीपेठमधील रस्त्याचे काम प्रलंबित

वाशिम : शहरातील नंदीपेठ भागातील रस्त्याचे काम अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी निखिल बुरकुले, आकाश कुटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

...............

लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करा!

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यानुषंगाने लक्षणे दिसून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी केले.

...............

रस्ता निर्मितीच्या कामास होणार प्रारंभ

मालेगाव : बेलखेडा ते पार्डी तिखे (४.५ कि.मी.), येवती ते रिठद २ (किमी) आणि शिरसाळा ते रिठद या २ किमी अंतराच्या रस्ता निर्मितीस मंजुरी मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

.................

भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण घटले

वाशिम : शहरातील गणेशपेठ, दंडे चौक परिसरात मध्यंतरी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी रात्रगस्त वाढविली असून, चोख बंदोबस्त तैनात राहत असल्याने चोऱ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे.

............

वाशिम शहरातील गर्दी नियंत्रणाबाहेर

वाशिम : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासनाच्या आदेशाने सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू राहून, त्यानंतर बंद होत आहेत. मात्र, याच वेळेत गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.

............

उड्डाणपुलाचे काम रखडले अधांतरी

वाशिम : वाशिम-पुसद रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन, तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. असे असताना संथगतीमुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.

...............

रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष

मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल झाले. मात्र, तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून, बहुतांश आरोपी अद्याप हाती लागलेले नाहीत.

..................

बस स्थानकात मिळेना पिण्याचे पाणी

वाशिम : स्थानिक बस स्थानकात पिण्याच्या शुद्ध पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. यामुळे प्रवाशी वैतागले आहेत. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी महेश धोंगडे यांनी निवेदनाद्वारे केली.

..............

शेतशिवारातील ऑटो स्विच हटविले

वाशिम : कृषिपंपांना वीजपुरवठा होणाऱ्या इलेक्ट्रिक स्टार्टरमधील डब्यात ऑटो स्विच बसविण्यात आले होते. या चुकीच्या प्रकाराकडे लक्ष पुरवून हे स्विच हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

Web Title: Appeal for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.