शेतक-यांनी मुंग व उडिद शेतमालाची नोंद नाफेड संस्थेकडे करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:10 PM2017-10-05T20:10:18+5:302017-10-05T20:10:45+5:30
वाशिम: राज्यात खरीप हंगाम २०१७-१८ या करीता मुंग व उडीद शेतमालाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच नाफेड मार्फत मुंग, उडिदाची खरेदी सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी अधिक चांगल्यापद्धतीने व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी नाफेड, खरेदी करणाऱ्या सब एजंट संस्था,कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह मुंग व उडीद शेतमालाची नोंदणी करण्याच्या सुचना या कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेकडे नोंद करण्याचे आवाहन शेतकºयांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शासनाकडून नाफेड खरेदीस मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी शेतकºयांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या-ज्या खरेदी केंद्राअंतर्गत शेतकरी वर्गांची गावे समाविष्ठ आहेत त्या-त्या केंद्रावर शेतकºयांनी जमीनीचे क्षेत्र,पीक पेºयाची नोंद असलेला ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, बँक खाते क्रमांकाची सविस्तर माहिती,पत्ता व भ्रमणध्वनी आदि कागदपत्रे सादर करुन आपलेकडील मुंग व उडीद शेतमालाची नोंद संबंधीत नाफेड खरेदी करणाºया नाफेडच्या संबंधित संस्थेकडे करावी. यानंतर शेतकºयांना क्रमवारीनुसार शेतमाल घेऊन येण्यास संबंधित संस्थेमार्फत कळविण्यात येणार आहे. दररोज १००० क्विंटल शेतमालाची मोजणी करुन घेण्याची व्यवस्था सदरचे खरेदी केंद्रावर करण्यात येणार आहे, मात्र आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी चांगल्याप्रकारे सुकवुन व चाळणी करुन एफएक्यू दर्जाचा शेतमाल आणल्यास त्याचा फायदा शेतकरी वर्गांना निश्चितच होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.