मजुरांनी कामाची मागणी नोंदविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:19+5:302021-03-14T04:36:19+5:30
जिल्ह्यातून कामानिमित्त मजुरांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना मागणीनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध करून ...
जिल्ह्यातून कामानिमित्त मजुरांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना मागणीनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. काम मागणीसाठी जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी नमुना क्र. ४ मध्ये लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी भरून द्यावा. या अर्जासोबत आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी.
ज्या अकुशल मजूर कुटुंबाकडे जॉबकार्ड नाही, अशा मजुरांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालयाकडे तत्काळ जॉबकार्डची मागणी नोंदवावी. मजुरांनी रोजगार मागणीसाठी अर्ज केल्यापासून १५ दिवसांच्या आता काम न मिळाल्यास नियमानुसार बेरोजगार भत्ता अनुज्ञेय राहील, असे उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी कळविले आहे.