सुरक्षित फवारणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:20+5:302021-07-09T04:26:20+5:30
----------- पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा वाशिम : कामरगाव परिसरात गतवर्षी जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा ...
-----------
पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा
वाशिम : कामरगाव परिसरात गतवर्षी जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. या नैसर्गिक आपत्तीला दोन महिने उलटून गेले तरी ८ जुलैपर्यंतही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
------------------------
उडीद, मुगाचे पीक वन्यप्राण्यांकडून फस्त
वाशिम : खरीप हंगामातील शेंग धारणेच्या स्थितीत असलेले उडीद, मुगाचे पीक वन्यप्राणी फस्त करीत आहेत. हरीण, माकड आदी वन्यप्राणी या पिकांत धुमाकूळ घालत असल्याचे चित्र गुरुवारीही पाहायला मिळाले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
-------------------------
रस्त्यावरील पाण्यामुळे ग्रामस्थांना अडचणी
वाशिम : उंबर्डा बाजार परिसरातील गावांच्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यात अडचणी येत असून, बांधकाम विभागाने ही समस्या लक्षात घेता या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी गुरुवारी ग्रामस्थांनी केली.
------------------------
बांबर्डा येथील नाल्या सफाईची मागणी
वाशिम : कारंजा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कामरगाव येथे महिनाभरापासून नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतने नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.