बियाणे उगवणशक्ती तपासूनच पेरणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:57+5:302021-05-14T04:40:57+5:30
तालुक्यातील ग्राम गायवळ येथे शेतकरी सागर भारत पोले यांच्या घरी सोयाबीन बियाणे प्रात्यक्षिकसंबंधी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सोयाबीन ...
तालुक्यातील ग्राम गायवळ येथे शेतकरी सागर भारत पोले यांच्या घरी सोयाबीन बियाणे प्रात्यक्षिकसंबंधी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सोयाबीन बियाणे घरच्या घरी कसे तयार करावे व उगवणशक्ती कशी तपासावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण राऊत, मंडळ कृषी अधिकारी एस. एच. चाैधरी, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
.....................
बाॅक्स :
बियाणे उगवणशक्ती तपासण्याची प्रक्रिया
सुती पोते किंवा चौकोनी कपडा घेऊन तो पूर्णपणे भिजवून घ्यावा. त्यावर सोयाबीन बियाणे टाकून व्यवस्थितपणे गोलाकार गुंडाळून घ्यावे, असे करताना बिया हलणार नाही, याची दक्षता घ्यावी. गुंडाळलेल्या कपड्यास किंवा पोत्यास सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस जेथे अधिक प्रकाश नाही, अशाठिकाणी ठेवावे. यादरम्यान त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे. त्यानंतर उगवण झालेली एकेक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी ७० बियांना चांगल्याप्रकारे मोड आल्यास बियाणे पेरण्यास योग्य असल्याचे समजावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.