घरपोच खत, बियाणांचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:10+5:302021-05-15T04:39:10+5:30

घरपोच खते, बियाणे याकरिता कृषी विभागाने ऑनलाइन लिंक दिलेली आहे. या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या गटामार्फत आवश्यक असलेली खते ...

Appeal to take advantage of homemade fertilizer, seeds | घरपोच खत, बियाणांचा लाभ घेण्याचे आवाहन

घरपोच खत, बियाणांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next

घरपोच खते, बियाणे याकरिता कृषी विभागाने ऑनलाइन लिंक दिलेली आहे. या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या गटामार्फत आवश्यक असलेली खते व बियाणांची नोंद करावी. त्यानुसार घरपोच खते, बी-बियाणे देण्यात येणार आहेत. शेतकरी गटामार्फत कृषी सहायकामार्फत एकत्रित खते आणि बियाणे याची मागणी कोणत्या कृषी सेवा केंद्राकडून करायची आहे हेही देण्यात यावे. यामुळे कृषी सेवा केंद्रांना एकत्रितपणे खते आणि बियाणे गावांमध्ये पुरवठा करण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. गटामार्फत खते आणि बियाणे पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उचल करणे आवश्यक आहे. वरील पद्धतीचा उपयोग करून शेतकऱ्यांनी खते व बियाणे उचल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या मार्फत सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन बॅगचे बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही, मागच्या वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासून पेरता येते, उगवण शक्ती कशी तपासावी याबाबत आपल्या गावात आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी मित्र, तसेच प्रगतिशील शेतकरी यांच्याद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम खरीप हंगामपूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. उगवण शक्ती तपासण्याबाबत अडचण/ शंका असल्यास आपल्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जांभरूणकर यांनी केले.

Web Title: Appeal to take advantage of homemade fertilizer, seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.