सिकलसेल रूग्णांची काळजी घेण्याचे आवाहन

By admin | Published: June 20, 2014 12:03 AM2014-06-20T00:03:21+5:302014-06-20T00:14:03+5:30

सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम जिल्हयात २0११ पासून राबविण्यात येत असून या रूग्णांची काळजी घेण्याचे आवाहन

Appeal to take care of sick patients | सिकलसेल रूग्णांची काळजी घेण्याचे आवाहन

सिकलसेल रूग्णांची काळजी घेण्याचे आवाहन

Next

वाशिम: सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम जिल्हयात २0११ पासून राबविण्यात येत असून या रूग्णांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतिने १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनानिमित्त केले. जिल्हा सामान्य रूग्णालयात सिकलसेल रूग्णांसाठी डे केअर सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्त्सक डॉ. क्षिरसागर, डॉ. अनिल कावरखे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. ससे, मेट्रन बेंद्रे हे वेळोवेळी सिकलसेल संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा सिकलसेल समन्वयक मनिषा अतकरे, टेलीमेडिसीन फॅसिलेटर सारिका हिर्डेकर, समुपदेशक निलीमा गावंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक वाळके, शेख इंद्रिस ही चमू सिकलसेलचे काम जिल्हयामध्ये चोखपणे बजावत असून १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जनजागृतीचे कार्य पार पडले. तसेच सिकलसेल तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा सामान्य रूग्णालय रक्तपेढीतून सिकलसेल व थॅलेसिमीयाच्या रूग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो. २0११ पासून तर २0१४ पर्यंंत ४८ सिकलसेल व ७७ थॅलॅसिमीयाच्या रूग्णांना रक्तपुरवठा करण्यात आल्याची माहिती आज छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आली. २0११ पासून सिकलसेल रूग्णांना जो रक्त पुरवठा करण्यात आला त्यामध्ये २0११ मध्ये २६, २0१२ मध्ये ६६, २0१३ मध्ये ७६ तर २0१४ मध्ये आजपर्यंंत ४८ रूग्णांचा समावेश आहे. तसेच थॅलॉसिमीया रूग्णांमध्ये २0११ मध्ये ६६, २0१२ मध्ये ११४, २0१३ मध्ये १२८ तर २0१४ मध्ये आजपर्यंंत ७७ रूग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला असल्याची माहिती डॉ. अनिल कावरखे यांनी दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर कार्यक्रमात सिकलसेल आजाराचे प्रकार, आजाराची लक्षणे त्यावर उपचारावर सविस्तर माहिती दिली. तसेच सिकलसेल रूगग्णांबात समातोल व प्रथीनेयुक्त आहार देणे, भरपुर पाणी पिण्यास सांगणे, भरपूर आराम, अतिकाम व चिंता टाळणे, नियमित तपासणी व डॉक्टरी सल्ला देणे, जंतुसंसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणेबाबत काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: Appeal to take care of sick patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.