लसीचा दुसरा डोस घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:29+5:302021-07-08T04:27:29+5:30
.................. खोकल्याची साथ; नागरिक त्रस्त वाशिम : शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून खोकला आणि घसादुखीची साथ सुरू असून, बाधितांची ...
..................
खोकल्याची साथ; नागरिक त्रस्त
वाशिम : शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून खोकला आणि घसादुखीची साथ सुरू असून, बाधितांची खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. खोकल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
...............
रिसोड, मानोरा बाधितांमध्ये निरंक
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड आणि मानोरा या दोन तालुक्यांमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाने बाधित एकही नवा रुग्ण निष्पन्न झाला नाही. यामुळे दोन्ही तालुक्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
......................
वीज देयक वसुलीची मोहीम जोरात
वाशिम : महावितरणकडून पुरविली जाणारी वीज वापरणाऱ्या ज्या ग्राहकांकडे रक्कम थकीत आहे, ती वसूल करण्यासाठी घरोघरी धडक दिली जात आहे. ही मोहीम गेल्या काही दिवसात जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
......................
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
वाशिम : पावसाळा सुरू असतानाही पावसाने दडी मारली आहे. यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.