कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:49+5:302021-06-28T04:27:49+5:30

..................... गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह ...

Appeal to throw garbage in the bins | कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन

कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन

Next

.....................

गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव

वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह सॅनिटायझरची व्यवस्थाही राहत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

............

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

वाशिम : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची आजमितीस मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी संदीप गोरे यांनी केली आहे.

................

ऑटोचालकांना कर्ज फेडण्याची चिंता

वाशिम : कोरोनाच्या संकटामुळे येत्या शैक्षणिक सत्रातही शाळा सुरू होतील किंवा नाही, याबाबत संभ्रम कायम असल्याने ऑटोचालकांचा रोजगार ठप्प झाला आहे. कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत आहे.

..................

व्यापारी संकुलांमध्ये आगीचा धोका

वाशिम : जिल्ह्यातील व्यापारी संकुलांमध्ये वेळप्रसंगी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच ठोस सोय नाही. संकुलांमध्ये अग्निरोधक यंत्र असणे आवश्यक असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

................

अवैध रेती उपशावर कारवाईच्या सूचना

वाशिम : नदीघाटांवरून चोरट्या मार्गाने अवैध रेती उपसा सुरूच असून या प्रकरणी ठोस स्वरूपात कारवाई करावी, अशा सूचना तहसीलदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

.............

वाहन परवाना मिळण्यास विलंब

वाशिम : वाहन परवाना मिळण्यास अर्ज केलेल्या अनेकांना परवाना मिळालेलाच नाही. हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावा, अशी मागणी जयप्रकाश शिंदे यांनी केली.

...............

संत्रा उत्पादक न्यायाच्या प्रतीक्षेत

वाशिम : गतवर्षी लॉकडाऊन काळात हैदराबादच्या कोल्ड स्टोरेजमधून दलालाने संत्रा परस्पर विकला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करूनही संबंधित संत्रा उत्पादकांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही.

..............

इंधन दरवाढीने नागरिक हैराण

वाशिम : पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा मोठा परिणाम झाला असून ऑॅटोचालक, मालवाहू वाहनधारक यासह इतरही नागरिक हैराण झाले आहेत.

..............

विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली

वाशिम : पैनगंगा नदीतील पाण्याचा सिंचनासाठी वापर व्हावा, यासाठी बॅरेजेस उभारण्यात आले. नदी क्षेत्रातील उपकेंद्रांची कामे मात्र रखडल्याने पाण्याचा फायदा होणार नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

...........

नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई

वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून रविवारी वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. यासह नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाईदेखील करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे यांनी सांगितले.

................

शाैचालय वापराकडे लाभार्थींचे दुर्लक्ष

वाशिम : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली; मात्र अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच होत नाही. बहुतांश नागरिक आजही उघड्यावरच शाैचास जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

................

पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

वाशिम : पांडवउमरा, दगडउमरा गाव परिसरातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे विशेषत: धुवाधार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

.................

संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी

वाशिम : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Appeal to throw garbage in the bins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.