लसीकरण करून घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:57+5:302021-04-16T04:41:57+5:30
00 महाबीजकडून हरभरा खरेदी वाशिम : महाबीजसाठी बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून हरभरा बियाणे तयार करण्यासाठी या शेतकऱ्यांकडून महाबीजने हरभरा ...
00
महाबीजकडून हरभरा खरेदी
वाशिम : महाबीजसाठी बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून हरभरा बियाणे तयार करण्यासाठी या शेतकऱ्यांकडून महाबीजने हरभरा खरेदीस सुरुवात केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
00
सबलीकरण योजनेला खीळ
वाशिम : जिल्ह्यात समाज कल्याण विभागांतर्गत दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शेकडो प्रस्ताव सादर केले असतानाही त्यांना मंजुरी मिळत नसल्याने या योजनेला जिल्ह्यात खीळ बसल्याचे दिसत आहे.
00
विटांचे भाव कडाडले
वाशिम : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुलासह विविध योजनेअंतर्गत घरकुलांची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे विटांची मागणी वाढली. विटांच्या भावात मोठी वाढ केल्याने घरकुल लाभार्थी अडचणीत आहेत.
00
रिठद येथे दवंडीद्वारे जनजागृती
वाशिम : रिठद परिसरात कोरोनाबाबत ग्रामपंचायतींद्वारे दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.
00
अनसिंग येथे एक कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : आरोग्य विभागातर्फे १५ एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार अनसिंग येथे आणखी एकजणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी सुरू केली.
00
किन्ही येथे पाणीपातळीत घट
वाशिम : गतवर्षी पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. आता मात्र कूपनलिकांची पाणीपातळी हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
0000
महाऊर्जा अभियानाची जनजागृती
वाशिम : महाऊर्जा अभियानाची युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी गुरुवारी केले आहे.
000
रस्त्यांवर खड्डे; वाहनधारक त्रस्त
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले; मात्र अल्पावधीतच रस्ते खराब झाले आहेत. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
000
संपर्कातील व्यक्तींच्या माहितीसाठी आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने कोरोना चाचणी करून माहिती पुरविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
000
रोहित्रांना संरक्षक कठड्याचा अभाव
वाशिम : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
000
केनवड येथे कृत्रिम पाणीटंचाई
वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसून, गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
000
व्यावसायिकांची कोरोना चाचणी
वाशिम : शिरपूर, शेलुबाजार, रिठद, केनवड परिसरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासन तथा आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे व्यावसायिकांची कोरोना चाचणी केली जात आहे.
00
गणेशपूर बॅरेजमध्ये सात टक्के जलसाठा
वाशिम : शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने गणेशपूर येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजमध्ये आता सात टक्के साठा उरला आहे.