उत्कृष्ट काम करणाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप : विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:52 PM2018-05-02T15:52:00+5:302018-05-02T15:52:00+5:30

 वाशिम : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते १ मे रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.

applause for the excellence of the great workmen: Distribution of various awards | उत्कृष्ट काम करणाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप : विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

उत्कृष्ट काम करणाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप : विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

Next
ठळक मुद्देराज्य परिवहन बस मधून आजीवन मोफत प्रवास करण्यासाठी विशेष सवलतीचे स्मार्ट कार्ड पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेर्चे व लघुपट स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

 वाशिम : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते १ मे रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्रभारी पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

डिजिटल स्वाक्षरीत सातबारामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तलाठी रेखा विजय पटुकले, पी. आर. वैद्य, सुधीर नामदेव लाड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डी. के. रणवीर, एम. डी. सोळंके, एम. एस. सोळंके, जी. आर. फटांगळे, पी. बी. राऊत, ए. एम. हिसेकर याकृषि सहाय्यकांचा व साखरडोह येथील शेतकरी चंद्रकांत रामधन राठोड, मैराळडोह येथील स्वामी विवेकानंद बहुद्देशीय व स्वयंसेवी शिक्षण प्रसारक मंडळाचा सन्मान केला. वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वती दगडू लहाने यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या राज्य परिवहन बस मधून आजीवन मोफत प्रवास करण्यासाठी विशेष सवलतीचे स्मार्ट कार्ड पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रमेश रत्नपारखी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खेमचंद पाटील, रमेश सुदामा गलांडे, पोलीस हवालदार रमेश परशराम ताजणे, पोलीस नायक संतोष काशिनाथ कंकाळ, क्रीडा क्षेत्रात  राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था, भगवान कैलास ढोले व स्नेहल ज्ञानेश्वर चौधरी यांचा सत्कार केला. जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाच्यावतीने स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेर्चे व लघुपट स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. निबंध स्पर्धेत १८ वर्षाखालील गटात हषार्ली सुरेश कवळे, अरुण नारायण गरड, नयना शामसुंदर खोटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षांवरील गटात बाळासाहेब गणपतराव बोराडे, दिपाली मोतीराम गव्हाणे, मनीष वसंतराव सुर्वे यांनी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. लघुपट स्पर्धेत १८ वर्षांवरील गटात किशोर कांबळे, आर. के. परमार, जावेद धनु भवानीवाले यांनी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

 

स्वच्छतेचे पुरस्कारही जाहिर

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील टनका, मोहजा रोड, गणेशपूर-बोरखेडी, मालेगाव तालुक्यातील एकांबा, वसारी, ढोरखेडा, रिसोड तालुक्यातील हिवरापेन, सवड, पिंप्री सरहद, मंगरूळपीर तालुक्यातील लाठी, तºहाळा, कोठारी, मानोरा तालुक्यातील इंझोरी, सोमठाणा, गिरोली, कारंजा तालुक्यातील धामणी खडी, शिवण बु. मोखड या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. जिल्हा स्मार्ट ग्राम इंझोरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

Web Title: applause for the excellence of the great workmen: Distribution of various awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.