कृषीविषयक योजनांच्या अर्ज प्रक्रियेस प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:11 AM2017-08-09T02:11:40+5:302017-08-09T02:12:12+5:30
वाशिम: राष्ट्रीय कडधान्य, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजना सन २0१७-१८ या वर्षांत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असून १४ ऑगस्ट ही अंतीम मुदत असल्याने शेतकर्यांनी त्यापूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय कडधान्य, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजना सन २0१७-१८ या वर्षांत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असून १४ ऑगस्ट ही अंतीम मुदत असल्याने शेतकर्यांनी त्यापूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी करण्यात आले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत सिंचन साधने व सुविधा या बाबींसाठी चालू वर्षात लाभ द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना शासकीय अनुदानावर तुषार संच, इलेक्ट्रीक पंप संच, एच.डी.पी.ई. पाईपचा लाभ दिला जाणार आहे. तुषार संच रुपये १0 हजार रुपये प्रति लाभार्थी, इलेक्ट्रीक पंपसंच रुपये १0 हजार प्रति नग व एच.डी.पी.ई.पाईप रुपये ५0 प्रतिमिटर (कमाल र्मयादा रुपये १५ हजार) याप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित रक्कम शेतकर्यांनी खर्च करावयाची आहे. राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजनेंतर्गत पी.व्ही.सी. पाईपसाठी शेतकर्यांना अनुदान देण्यात येणार आहे. पी.व्ही.सी. पाईपसाठी रुपये २५ प्रति मीटरप्रमाणे शेतकर्यांना कृषि खात्यामार्फत अनुदान देण्यात येणार आहे.
सदर दोन्ही योजनेंतर्गत विविध बाबींचा लाभ घेवू इच्छिणार्या शेतकर्यांना सदरचा लाभ मिळणेबाबतचा अर्ज शेतकर्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे दिनांक १४ ऑगस्टपयर्ंत करावा. तालुक्यास प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास शेतकर्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. विविध बाबीकरीता निवड झालेल्या शेतकर्यांना तालुका कृषि अधिकारी यांचेकडून पुर्व संमती देण्यात येणार आहे.
पुर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर शेतकर्यांनी खुल्या बाजारातुन तुषार संच, इलेक्ट्रीक पंपसंच, एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी. पाईपाची खरेदी करावयाची आहे. तसेच अनुदानाची मागणी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे करावयाची आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संर्पक साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.