‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत स्वीकारले जाणार अर्ज!

By admin | Published: April 4, 2017 07:05 PM2017-04-04T19:05:08+5:302017-04-04T19:05:08+5:30

ही प्रक्रिया १५ मे पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी दिली.

Application for 'Housing for all' applications! | ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत स्वीकारले जाणार अर्ज!

‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत स्वीकारले जाणार अर्ज!

Next

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यास वाशिममध्ये मुर्तरूप मिळत असून बुधवार, ५ एप्रिलपासून योजनेचे छापील अर्ज ह्यआॅनलाईनह्ण नोंदणीच्या पावतीसह स्विकारण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला जात आहे. ही प्रक्रिया १५ मे पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी दिली.
केंद्र शासनामार्फत २५ जून २०१५ रोजी सर्वांसाठी घरे (नागरी) योजना अंमलात आली. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या राज्यातील ५१ शहरांमध्ये वाशिम शहराचा समावेश आहे. योजनेची अंमलबजावणी शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Application for 'Housing for all' applications!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.