सिंचन विहिरींकरीता लाभार्थींकडून अर्ज मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 05:32 PM2019-08-01T17:32:23+5:302019-08-01T17:33:56+5:30
सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांकडून ५ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंंतर्गत सन २०१९-२० या वर्षात नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांकडून ५ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती व आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष घटक योजना सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. १.५० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºया अनु.जाती व नवबौद्ध शेतकºयांना तसेच आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग, वीजजोडणी, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी बाबींसाठी अनुदान दिले जाते. यासाठी संबंधित शेतकºयांच्या नावे ग्रामीण भागात जमिनधारणेचा ७/१२ व ८-अ असणे आवश्यक आहे. दीड लाख रुपये उत्पन्न, सक्षम प्राधिकाºयांचे जातीचे प्रमाणपत्र, ग्रामसभेने शिफारस केलेला ठराव, नविन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास प्रस्तावित क्षेत्रात ५०० फुट अंतरावर दुसरी विहीर नसावी, आधारकार्ड तसेच आधारलिंक बँक खाते क्रमांक, अनु. जातीच्या शेतकºयांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकºयांना तसेच वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकºयांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा ५ आॅगष्ट ते ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत या कालावधीकरीता उपलब्ध राहणार आहे. इच्छुक शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रासह शासकीय संकेतस्थळावर विहीत मुदतीत अर्ज करावे तसेच आॅनलाईन अर्जाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीचे कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडे अर्जदार शेतकºयाने स्वत: जमा करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, कृषी विकास अधिकारी प्रल्हाद शेळके यांनी केले.