रोपवाटिका योजनेसाठी अर्ज मागविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:25+5:302021-05-05T05:07:25+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत शेडनेट गृहासाठी खर्च ३ लक्ष ८० हजार रुपये असून, यासाठी शासनाचे अनुदान १ लक्ष ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत शेडनेट गृहासाठी खर्च ३ लक्ष ८० हजार रुपये असून, यासाठी शासनाचे अनुदान १ लक्ष ९० हजार रुपये आहे. शेटनेट गृहाचा आकार १ हजार स्क्वेअर मीटर राहणार असून, यामध्ये ३.२५ मीटर उंचीचे फॅल्ट टाइप असेल. पॉली टनल तयार करण्याचा खर्च ६० हजार रुपये असून, यासाठी शासनाचे अनुदान ३० हजार रुपये आहे. आकारमान एक हजार स्क्वेअर मीटर इतके राहील. पावर नॅपसॅक स्प्रेअर क्षमता १२ ते १६ लिटर, ०.७५ ते १.०० व ४.०० बी. आय. एस. प्रमाणकानुसार यासाठी एकूण खर्च ७ हजार ६०० रुपये, शासकीय अनुदान ३८०० रुपये. कॅरेटस एकूण ६२ यासाठी येणारा एकूण खर्च १२,५०० रुपये असून, शासनाचे अनुदान ३२०० रुपये आहे. लाभार्थ्यांची निवड करताना अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. अर्जासोबत शेतीचा सात-बारा जोडावा. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी, असे तालुका कृषी अधिकारी, मालेगाव यांनी कळविले आहे.