विविध योजनांसाठी पशुपालकांकडून अर्ज मागविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:27+5:302021-07-12T04:25:27+5:30
विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थ्यांना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचा ...
विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थ्यांना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड झाल्यास एक महिन्याच्या आत २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागेल. या योजनेचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना २ दुधाळ जनावरे राज्याबाहेरून किंवा जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारातून खरेदी करून देण्यात येतील. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौद्ध लाभार्थ्यांना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकूड असा गटाचा पुरवठा करण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांची निवड झाल्यास एका महिन्याच्या आत उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळीच्या जातीसाठी २५ हजार ८८६ रुपये व स्थानिक जातीसाठी १९ हजार ५५८ रुपये लाभार्थी हिस्सा चलानाद्वारे भरावा लागणार आहे. या योजनांचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले.
००००
अनुदानावर वैरण बियाणे!
वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेअंतर्गत लाभार्थींना शंभर टक्के अनुदानावर पशुपालक शेतकऱ्यांसाठी वैरण बियाणे वाटप करते ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी १,५०० रुपये मर्यादेत वैरण बियाणे वाटप करण्यात येईल. या सर्व योजनांच्या अर्जाचे नमुने पंचायत समितीस्तरावर पशुसंवर्धन विभागात उपलब्ध आहेत. तसेच अर्ज स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीस्तरावर स्वीकारले जात आहेत.