पीएचडी मार्गदर्शक म्हणून १७८ प्राध्यापकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:50 IST2020-06-20T15:50:10+5:302020-06-20T15:50:16+5:30
अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ६२ प्राध्यापकांचा समावेश आहे.

पीएचडी मार्गदर्शक म्हणून १७८ प्राध्यापकांची नियुक्ती
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने आगामी सत्रात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागातील १७८ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. विद्यापिठातील विविध शाखा विभाग प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुरुवारी प्राप्त झाली आहे. त्यात पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ६२ प्राध्यापकांचा समावेश आहे.
विविध विद्यापीठांमध्ये विविध शाखांतर्गत पीएचडीच्या पदवीसाठी संशोधन केले जाते. या पीएचडीच्या परिक्षेसाठी मार्गदर्शक किंवा गाईडची निवड करणे आवश्यक आहे. यंदाच्या सत्रातील पीएचडीच्या परिक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापकांची निवड करण्याच्या उद्देशाने अमरावी विद्यापिठातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यात प्राप्त अर्जातून विभागातील पाचही जिल्ह्यातील मिळून १७८ प्राध्यापकांची पीएचडी मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसह पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक एका प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील १३ प्राध्यापकांचा, तसेच बुलडाणा जिल्ह्यातील २४, तर अकोला जिल्ह्यातील २५ प्राध्यापकांचा समावेश आहे.