'बहुजन हिताय' कर्मचारी पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 03:42 PM2019-04-16T15:42:55+5:302019-04-16T15:43:00+5:30
पतसंस्थेच्या संचालक मंडळातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : कारंजा येथील बहुजन हिताय कर्मचारी पतसंस्थेवर प्रशासक म्हणून कांरजा येथील सहाय्यक दुय्यक निबंधक यांची नेमण्ूाक झाल्याने सदर पतसंस्थेतील ठेवीदारांची धाकधुक वाढली आहे. सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.
कांरजा येथील बायपास परिसरातील गुरूकृपा हॉटेलच्या ईमारतीत बहुजन हिताय कर्मचारी मर्यादित पतसंस्था रजि नं. ७६४ ही मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. सदर पतसंस्थेचे रामेश्वर सावके यांच्या अध्यक्षतेखाली ११ संचालकांचे संचालक मंडळ होते. त्यातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधकाच्या वतीने देण्यात आली आहे. राजीनामा देणाºया संचालकात अनंता जनार्धन धोटे ,प्रविण सखाराम पुरी , विष्णू भगवान वाघ, सुधाकर श्रीकृष्ण राउुत, शेषराव मुळे व मोहन आत्माराम घाटे या संचालकांचा समावेश आहे. वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सादर केलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. सदर पतसंस्थेत ७ ते ८ ठेवीदारांच्या ३२ लाख रूपयांच्या ठेवी असून प्रशासकाची नेमणूक केल्याने ठेवीदारांची धाकधुक वाढली आहे. संचालक मंडळाच्यावतीने मजीर्तील ३५ कर्जदारांना ६५ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सध्यपरिस्थितीत सदर पतसंस्था डबघाईस आली असून पतसंस्थेत रक्कम जमा नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे आव्हान प्रशासकापुढे उभे ठाकले आहे. आमच्या प्रतिनीधींनी कांरजाचे सहायक दुय्यम निबंधकाशी संपर्क साधला असता सदर पतसंस्थेच्या ६ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासक म्हणून १४ फेबु्रवारी २०१९ रोजी गुल्हाणे यांची नेमणूक करण्यात आली.
कर्जदारांच्या कर्जवसुलीतून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाईल असे यावेळी बोलतांना ए. आर. गुल्हाणे यांनी सांगितले. येत्या २ ते ३ दिवसात कर्जदाराकडून २० लाख रूपयांची वसुली करून टप्प्याटप्याने ठेवीदारांना देण्यात येईल. यासाठी १४ एप्रिल रोजी सदर पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या उपस्थितीत कर्जदारांची बैठकही घेण्यात आली. त्यामुळे सदर पतसंस्थेतील ठेवीदारांनी चिंता करू नये असे आवाहन सहायक दुय्यम निबंधक गुल्हाणे यांनी केले
पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक जरी असली तरी ठेवीदारांनी काळजी करु नये. पतसंस्थेत ३२ लाखाच्या ठेवी असून त्यावर ६५ लाख कर्जवाटप आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत दिल्या जातील, ठेवीबद्दल काळजी करु नयेत्र
-पी.एम. गुल्हाने , सहाय्यक दुय्यम निबंधक