सौरपंपाच्या १८० अर्जांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:53+5:302021-04-02T04:43:53+5:30

--- मध्यम प्रकल्पांत ५० टक्केच साठा वाशिम: जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत आहे. अद्यापही सिंचनासाठी प्रकल्पातून उपसा होत असून, ...

Approval of 180 applications for solar pumps | सौरपंपाच्या १८० अर्जांना मंजुरी

सौरपंपाच्या १८० अर्जांना मंजुरी

Next

---

मध्यम प्रकल्पांत ५० टक्केच साठा

वाशिम: जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत आहे. अद्यापही सिंचनासाठी प्रकल्पातून उपसा होत असून, उन्हाचा पार वाढत असल्याने पातळीवर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत तिन मध्यम प्रकल्पांत मिळून ५० टक्के जलसाठा उरला आहे.

-----------

आरोग्य विभागाची बैठक

वाशिम: जिल्ह्यात गुरुवारी ३२३ नवे कोरोनाबाधित आढळून आले. या पार्श्वभूमीवर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर नागरिकांची कोरोना चाचणी वेगाने करण्याबाबत नियोजन करण्यासाठी आरोग्य विभागाची शुक्रवारी जिल्हास्तरावर बैठक पार पडली.

----------------

१८ ग्रामसेवकांची पदे रिक्त

वाशिम: जिल्हाभरात ग्रामपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणाºया ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. जिल्हाभरात १८ ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची मागणी होत आहे.

----------

ग्रामस्तरीय समित्यांना मार्गदर्शन

वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामस्तर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रामसमित्यांना त्यांच्या जबाबदारीबाबत शुक्रवारपासून प्रशासनाने मार्गदर्शन सुरू केले आहे.

--------------------

Web Title: Approval of 180 applications for solar pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.