विविध अर्थसहाय्य योजनेच्या १८६ प्रकरणांना मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:09 PM2019-02-08T15:09:39+5:302019-02-08T15:09:52+5:30
मालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे होते. यावेळी तहसिलदार राजेश वझिरे, समिती सदस्य अमोल माकोडे, संगीता राऊत, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, डॉ. गजानन ढवळे, साहेबराव नवघरे, एस.ए. ठोकळ, सी.बी. इंगोले, श्रद्धा काळसरपे आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये श्रावण बाळ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ५४ प्रकरणे, दारिद्र्यरेषेवरील ४४ प्रकरणे, दिव्यांग ५६, विधवा (भाग-१) ८, विधवा (भाग-२) १०, परित्यक्त्या ७, केवळ विधवा ७ अशा प्रकरणांचा समावेश आहे. दिव्यांगांची एकूण ६० प्रकरणे मंजूरीसाठी ठेवली होती. ४ प्रकरणे त्रूटीत असल्याचे आढळून आले. दारिद्र्यरेषेवरील ४, दारिद्र्यरेषेखालील एक अशी प्रकरणेही त्रूटीत आहेत. त्रूटीत असलेल्या प्रस्तावासंदर्भात कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज सादर करावे, असे आवाहन समिती अध्यक्ष लादे यांनी केले. अर्ज सादर करताना कुणीही दलाल किंवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क न साधता संजय गांधी निराधार योजना समिती, तहसिल कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहनही लादे यांनी केले.