वाशिम जिल्ह्यातील १0 गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांना मंजुरी
By admin | Published: August 15, 2016 02:20 AM2016-08-15T02:20:43+5:302016-08-15T02:20:43+5:30
दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध,पशुपालकांची सोय होणार.
वाशिम, दि १४ : जिल्हा नियोजन समितीमार्फत आलेल्या निधीमधून नव्याने १0 पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात आला, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी दिली.
जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतींची स्थिती अत्यंत नाजूक असून, बहुतांश दवाखान्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकार्यांना अपेक्षित सेवा पुरविणे अशक्य ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन रिठद, अनसिंग, काजळेश्वर, लाडेगाव, खंडाळा शिंदे यासह इतर पाच गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उभारल्या जाणार आहे. दुधाची प्रचंड मागणी वाढली असताना परजिल्ह्यातून दूध विक्रीस येत आहे. पशुधन वाढीला चालना मिळाल्यास दुधाचे उत्पादन वाढून पशुपालकांना चांगली मिळकत होऊ शकते. ही महत्त्वाची बाब डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात नव्याने १0 पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात आला, अशी माहिती सानप यांनी दिली.