एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:31+5:302021-04-02T04:43:31+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. त्यामुळे काही साहित्य खरेदी करायचे झाल्यास दुपारच्या सुमारासच बाहेर पडावे लागत आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असून तोंडाला, कानाला रुमाल व डोळ्याला काळा चष्मा घालून उन्हापासून बचाव केला जात असल्याचे दिसून येत आहे.
............
मंगळवारचे रेकाॅर्ड
१) जिल्ह्यात २७ मार्चपासून उन्हाचा पारा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच मंगळवार, ३० मार्च रोजी तापमान ४१ अंशावर पोहोचले होते.
२) ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी तापमानात केवळ एका अंशाने घसरण होऊन ४० अंशावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
............
असा राहील आठवडा
आगामी आठवड्यात जिल्ह्याचे तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सियस यादरम्यान राहणार आहे. त्यानुसार, शुक्रवारी ३८, शनिवार - ३९, रविवार - ३८, सोमवार - ३९, मंगळवार - ३९ आणि बुधवारचे सरासरी तापमान ३९ अंश सेल्सियस राहणार असल्याचे हवामान विभागाकडून कळले.