ऑनलाईन परीक्षेमुळे ‘मध्यस्थ’ आऊट
By Admin | Published: January 12, 2015 01:46 AM2015-01-12T01:46:31+5:302015-01-12T01:46:31+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभागात उत्तीर्ण उमेदवारांचे प्रमाण ९२ टक्क्यांवरून ७६ टक्क्यांवर
संतोष वानखडे /वाशिम
वाहतुकीच्या नियमांची प्रत्यक्ष उजळणी करून घेणार्या ह्यऑनलाईनह्ण परीक्षेमुळे मध्यस्थांची लुडबुड व बोगस उमेदवारांच्या परवान्याला चाप बसला आहे. वाहतुकीचे नियम माहीत असणारे उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्ण होत असल्याने साहजिकच, पूर्वीच्या तुलनेत उत्तीर्ण उमेदवारांचा टक्काही घसरला आहे. ऑनलाईन परीक्षेपूर्वी उत्तीर्णतेचे असलेले ९२ टक्के प्रमाण आता ७६ टक्क्यांवर आले असल्याची साक्ष वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाची आकडेवारी देत आहे. वाहतुकीच्या नियमांची प्रत्यक्ष उजळणी करून घेणार्या ह्यऑनलाईनह्ण परीक्षेने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. साधारणत: वर्षभरापूर्वी शिकाऊ वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रिया सोपी होती. रहिवासी दाखला व ओळखीच्या प्रमाणपत्रासह अर्ज करणार्यांना परिवहन विभाग परवाना देऊन टाकत होते. अनेक वेळा तर परवाना मागणार्याला वाहतुकीच्या नियमांशी काही देणे-घेणेही नव्हते. यातूनच रस्ते अपघातांचा आलेख वाढत चालला होता. रस्ते अपघाताची संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून तसेच वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेपाला चाप बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २0१४-१५ पासून ऑनलाईन परीक्षा सुरू केली आहे. ऑनलाईन परीक्षेने लर्निंग लायसन्स प्रक्रियेमधील मानवी लुडबुडीला चाप लावला; सोबतच उमेदवारांना वाहतुकीच्या नियमांची जाणीवही करून देत आहे. ऑनलाईन नाव नोंदणीनंतर लर्निंस लायसन्ससाठी (शिकाऊ परवाना) सीसीटीव्हीच्या नजरेखाली परीक्षा घेतली जाते. ऑनलाईन परीक्षा पद्धतीत मानवी हस्तक्षेपाला प्रतिबंध असल्याने साहजिकच वाहतुकीच्या नियमांची उजळणी उमेदवारांना करावीच लागत आहे. वाहतुकीच्या नियमांना ठेंगा दाखविणारे उमेदवार आपसूकच ऑनलाईन परीक्षेतून बाद होत आहेत. ऑनलाईन परीक्षेपूर्वी लर्निंग लायसन्स मिळण्याचे शेकडा प्रमाण ९२ टक्के होते. आता हेच प्रमाण ७६ टक्क्यापर्यंत खाली आले आहे. २0१३-१४ मध्ये २२ हजार ८१८ पैकी २0 हजार ९९४ उमेदवारांना लर्निंंग लायसन्स मिळाले होते. ऑनलाईन परीक्षेनंतर ३२३२ पैकी २४६२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.