रब्बीचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:40 PM2017-10-07T13:40:39+5:302017-10-07T13:43:07+5:30

The area of ​​Rabbi will decrease | रब्बीचे क्षेत्र घटणार

रब्बीचे क्षेत्र घटणार

Next
ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम कृषी विभागाकडून शेतकºयांना खबरदारीचे आवाहन 

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. 

वाशिम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८ असताना यंदा मात्र ५ आॅक्टोबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ७० पाऊस पडला. अल्प पावसामुळे प्रकल्पात जलसंचयच झाला नसून, सद्यस्थितीत ३३ प्रकल्पांत केवळ शुन्य टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांतील उपलब्ध उपयुक्त जलसाठा मिळून केवळ २४ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा सिंचन शेती अशक्य होणार असल्याने सिंचनावरच अवलंबून असलेला रब्बी हंगामातील क्षेत्र घटधार असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ८१ हजार हेक्टर असून, कृषी विभागाने यंदा १ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये गहू आणि हरभरा ाय पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे.  गव्हाचे नियोंजित क्षेत्र ४५ हजार हेक्टर, तर हरभरा पिकाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. त्याशिवाय रब्बी ज्वारी दीड हजार हेक्टर, करडई ४०० हेक्टर आणि मक्याचे क्षेत्र १०० हेक्टर आहे. यातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना पाण्याची मोठी गरज असते; परंतु जलप्रकल्पांबरोबरच विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने शेतकरी पिकांना पाणी कसे देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. या वर्षीच्या अपुºया पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही.  रब्बी हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसताना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नसल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात ३० टक्क्याहून अधिक घट येण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: The area of ​​Rabbi will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.