वाशिम येथील लघुव्यावसायिकांची टिळक गार्डनमध्ये व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 03:56 PM2019-12-21T15:56:59+5:302019-12-21T15:57:07+5:30

फेरीवाले रस्त्यावर येऊ नये याकरिता त्यांना पर्यायी जागा म्हणून टिळक गार्डनमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Arrangements for small businessmen in Tilak Garden in Washim | वाशिम येथील लघुव्यावसायिकांची टिळक गार्डनमध्ये व्यवस्था

वाशिम येथील लघुव्यावसायिकांची टिळक गार्डनमध्ये व्यवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : शहरातील काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे अनेक लघुव्यावसायिकांसह भाजीविक्रेत्यांना व्यवसाय कुठे करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अतिक्रमण काढल्यानंतरही पुन्हा काही दिवसानंतर फेरीवाले रस्त्यावर येऊ नये याकरिता त्यांना पर्यायी जागा म्हणून टिळक गार्डनमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रीयेच्या हालचालींना प्रारंभ झाला असून जागेची पाहणी सुध्दा करण्यात आली आहे.
वाशिम शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम मोठया प्रमाणात करण्यात येत असून पुन्हा अतिक्रमण होवू नये याकरिता दररोज अतिक्रमण हटविल्या जागेची पाहणी करुन पुन्हा अतिक्रमण झाले  का याची पाहणी नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येत आहे. तरी सुध्दा काही लघुव्यावसायिक, फेरीवाले रस्त्यावर उभे राहत असून अतिक्रमण पथक आल्यानंतर तेथून पळून जात आहेत. ही नेहमीची कटकट दूर करण्यासाठी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी सद्यस्थितीत उपयोगात नसलेले व भव्य जागा असलेल्या टिळक बागेचा वापर लघुव्यावसायिकांसाठी व्हावा याकरिता प्रयत्न चालविले आहेत. २० व २१ डिसेंबर रोजी टिळक बागेची पाहणी करुन कोणत्या ठिकाणी कोणाला बसवावे यावर विचार विनीमय करण्यात आला. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी अग्रवाल, इंजिनिअर राजेश घुगरे, कर निरिक्षक शेख अजिज शेख सत्तार, पाणी पुरवठा विभागाचे सोनुने, साखरकर, शहर वाहतुक शाखा निरिक्षक राजु वाटाणे, जितु बढेल आदिंची उपस्थिती होती.
 
वाशिम शहरात पुन्हा अतिक्रमण उभे राहू नये. शहर स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता नगरपरिषदेच्यावतिने प्रयत्न करण्यात येत आहेत. वाशिम येथील टिळक गार्डनचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा याकरिता येथे लघुव्यावसायिकांना जागा देण्याचा विचार सुरु आहे. लवकरच हा निर्णय घेऊन यामध्ये लघुव्यावसायिकांना व्यवसायाकरिता जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी संबधितांशी चर्चा होत आहे. असे झाल्यास शहरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही.
- दीपक मोरे,  मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

Web Title: Arrangements for small businessmen in Tilak Garden in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम