रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक
By नंदकिशोर नारे | Published: March 14, 2024 04:56 PM2024-03-14T16:56:22+5:302024-03-14T16:57:19+5:30
पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटलची आवक नोंद झाली आहे.
वाशिम : रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळद खरेदीचा शुभारंभ १४ मार्चला करण्यात आला. पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटलची आवक नोंद झाली आहे.
यावेळी आ. अमित झनक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय शिंदे, उपसभापती राजाराम आरू , संचालक विष्णुपंत भुतेकर, संचालक धनंजय बोरकर, रवींद्र चोपडे यांची उपस्थिती होती . पहिल्याच दिवशी हळदीला चांगला भाव मिळाला असून हळद गट्टू १५ हजार ७०० ते १६ हजार ६०० व हळद कांडीला १५ हजार ५०० ते १६ हजार २०० रुपये भाव मिळाला. तसेच मिनी शेलमला १६ ते १७ हजार व सुपर शेलमला १७ ते १८ हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे. नवीन हळद खरेदीचा शुभारंभ करण्यात आला यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला .यावेळी हळद उत्पादक शेतकऱ्यांचा अंदाज घेणे त्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला