युवा संमेलनात कलावंतांचा उत्स्फुर्त सहभाग

By admin | Published: December 22, 2014 11:47 PM2014-12-22T23:47:35+5:302014-12-22T23:47:35+5:30

वाशिम येथे जिल्हास्तरीय युवा संमेलन व लोककला उत्सव.

Artistic participation in youth meeting | युवा संमेलनात कलावंतांचा उत्स्फुर्त सहभाग

युवा संमेलनात कलावंतांचा उत्स्फुर्त सहभाग

Next

वाशिम : स्थानिक जि.प. च्या जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात नेहरु युवा केंद्र वाशिमच्यावतीने जिल्हास्तरीय युवा संमेलन व लोककला उत्सव पार पडला. यामध्ये जिल्हाभरातील कलावंतांनी सहभाग नोंदवित आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून दिली. समारोपीय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकणी, पुणे येथील श्री रामकृष्ण विवेकानंद मठाचे स्वामी बुध्दानंद, पुण्याचे उद्योगपती प्रशांत पुप्पल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे े प्राचार्य अनिल रेड्डीवार, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. पद्मानंद तायडे, निलेश सोमाणी, जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य गजानन धामणे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुलकर्णी म्हणाले की, कुठलेही कार्य पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सकारात्मक दृष्टी असणे गरजेचे आहे. त्यामुळे आयुष्यात आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची नितांत गरज आहे. देशाचे उज्वल भविष्य असलेल्या युवा पिढीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्याही घटनेचे अवलोकन चिकीत्सक बुध्दीने करुन त्याची पडताळणी करावी. मी एक चांगला माणूस बनेल हा दृष्टीकोण बाळगावा. सर्वात महत्वाचे म्हणजे युवावर्गाने चारित्र्यशिल असणे महत्वाचे आहे. तसेच शासनाच्या प्रशासनाचा एक भाग म्हणून युवावर्गाने कार्यरत राहावे, असे जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी स्वामी बुध्दानंद यांनी, युवकांमध्ये आत्मश्रध्दा असली पाहीजे आणि काम करण्याची जिद्द असली पाहीजे, असे सांगितले. प्राचार्य रेड्डीवार, उद्योगपती पुप्पल, निलेश सोमाणी, क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर, प्रा. पद्मानंद तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात विनय गित रजनी संचाच्या स्वागतगिताने झाली. यावेळी नेहरु युवा केंद्राच्या वतीने दिला जाणारा सन २0१४-१५ चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार शिरपूर जैन येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक व सामाजीक बहूउद्देशिय संस्थेला देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र व रोख २५ हजार असे होते.

Web Title: Artistic participation in youth meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.