रामभक्तातर्फे शहरात बनताहेत तब्बल ७१ हजार माेतीचूर लाडू!
By नंदकिशोर नारे | Published: January 19, 2024 01:56 PM2024-01-19T13:56:56+5:302024-01-19T13:57:12+5:30
निमित्त राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळयाचे : संपूर्ण शहरात केले जाईल वाटप
वाशिम : अयाेध्या येथे प्रभू रामचंद्र मंदिर प्रांण प्रतिष्ठापनान सोहळ्यानिमित्त रामभक्त संतोष शिंदे यांच्याकडून तब्बल ५१ हजार मोतीचूर लाडूचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला हाेता. ते आता ७१ हजार लाडुचे वाटप करणार असून लाडू बनविण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. याकरिता २७ क्विंटल पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये साखर, बेसन, तेल, विलायची, काजू, किसमिस, कलर आदिंचा समावेश आहे.
अयाेध्या येथील श्री राम मंदिरात स्थापन हाेत असलेल्या राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा साेहळ्यानिमित्त संपूर्ण जिल्हयात कलश रथ यात्रेद्वारे एकीकडे अक्षता वाटप करण्यात येत आहे, तर काही जणांकडून शहरात विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. रामभक्त तथा भाजपाचे शहराध्यक्ष संताेष शिंदे यांनी तब्बल ७१ हजार लाडू तयार करुन ते शहरातील प्रत्येक वार्डासह मंदिरात वाटप करण्याचा संकल्प केला. वाशिम शहरातील देवपेठ येथील विठ्ठल मंदिरात गत तीन दिवसांपासून लाडू बनविण्याचे काम सुरु असून ते अंतीम टप्प्यात आले आहे. याकरिता एकूण आचाऱ्यासह ४६ जण लाडू बनविण्याच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. याकरिता जवळपास ५ लाख रुपयांपर्यंत खर्च हाेत असल्याचे सांगण्यात आले. २२ जानेवारी राेजी याचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील रामभक्त परिश्रम घेत आहेत.
लाडूसाठी लागत असलेले साहित्य
साखर १४ क्विंटल
बेसन ७ क्विंटल
तेल ७० किलाे
विलायची ५ किलाे
काजू ५० किलाे
कलर व इतर साहित्य
गॅस सिलिंडर ५० टाकी
माणसे ४६
महिला ३०
पुरुष १६
अयाेध्येमध्ये श्री राम मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा हे माेठी आनंदाची बाब असून आपणही यामध्ये काही तरी वाटा नाेंदवून याचे साक्षिदार बनावे यासाठी आपण हे करीत आहे.
संताेष शिंदे, श्रीरामभक्त, वाशिम
राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळयानिमित्त माेतीचूर लाडू बनविण्याचे काम मिळाले असून एका भव्य कार्यक्रमासाठी काम करण्याचे समाधान मिळत आहे. यापूर्वी आपल्या कधीच एवढे माेठे काम मिळाले नाही.
विशाल शर्मा, आचारी