कायाकल्प अभियानात आसेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिम जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:30 PM2018-03-31T14:30:31+5:302018-03-31T14:30:31+5:30
वाशिम: राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प अभियानात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांनी पुरस्कार पटकावले आहेत.
वाशिम: राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प अभियानात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांनी पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील दोन, तर रिसोड आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका आरोग्य केंद्राचा समावेश आहे. त्यामध्ये आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गत महिन्यात राज्यभरात कायाकल्प अभियान राबविले. या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांची पाहणी केली. त्यामध्ये स्वच्छतेसह जनतेशी निगडित सोयीसुविधांचे सुक्ष्म निरीक्षण त्यांच्याकडून करण्यात आले. यात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्र पुरस्कारासाठी पात्र ठरले. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम, मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने दुसरा, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राने तिसरा, तर रिसोड तालुक्यातील केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने चौथा क्रमांक पटकावला. प्रथम पुरस्काराबद्दल आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला २ लाख, तर इतर आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० रुपये पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना या कामगिरीसाठी रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, आसेगाव केंद्रांतर्गत २७ गावे समाविष्ट असून, या गावांतील २७ हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाºयांवर आहे. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत. त्यांनी कायाकल्प अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली. कायाकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातून मिळालेला प्रथम पुरस्कार चंद्रकांत ठाकरे यांच्याहस्ते आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप नव्हाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश सुर्वे, डॉ स्नेहल जाधव, देवराव महल्ले, पंचायत समिती सदस्य वनिता चव्हाण, श्रध्दा शेळके, अनंत शेळके, मनवर खान, भारत खडसे, सरपंच गजानन निंबाजी मनवर, विष्णू चव्हाण, बळवंत मोकळे, मुदस्सिर खान, शेख इरफान, शेख मुफीद, डॉ. शौकत खान, फिरोज शहा, जावेद पटेल, गोपाल संगेकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगावमधील सर्व कर्मचाºयांची उपस्थिती होती.