जलसंधारणाच्या कामासाठी मागितली भिक्षा !
By admin | Published: April 7, 2017 10:33 PM2017-04-07T22:33:36+5:302017-04-07T22:33:36+5:30
कारंजा लाड- जलसंधारणाची कामे करताना वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनचा खर्च करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क भिक्षा मागून निधी गोळा केला.
कारंजा लाड : महाराष्ट्रात गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करताना आलेल्या अडचणींच्या वेळी आवश्यकता पडल्यास वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनचा खर्च करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क भिक्षा मागून निधी गोळा केला. हा उपक्रम कारंजा तालुक्यातील काकडशिवणीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी राबविला.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून कोरड्या दुष्काळामुळे पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. यासमस्येचा निराकरणासाठी अभिनेता अमिर खान याने राज्यशासनाला विश्वासात घेवून पाणी फाउंडेशनची निर्मिती केली. मागील वर्षी पाणी फांउडेशनच्या माध्यमातुन वॉटर कप स्पर्धा राबवून लोक सहभागातून दहा तालुक्यात जलसंधारणाची कामे करण्यात आली. यावर्षी ही स्पर्धा राज्यातील ३० तालुक्यात घेण्यात येत आहे यामध्ये कारंजा तालुक्यातील सर्वच गावानी सहभाग घेतला आहे. पाणी समस्या ही सर्वांनाच भेडसावडणारी समस्या आहे ही समस्या मिटविण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग लाभावा या उद्देशाने कारंजा तालुक्यातील काकड शिवनी या गावात एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढावा व प्रसंगी आर्थीक अडचणीने काम अडल्यास रक्कम हाती असावी म्हणून चक्क गावात भिक्षा मागीतली. यासाठी ७ एप्रिल रोजी सकाळी पाणी फउंडेशनची चमू जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत व बाबासाहेब धाबेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून रॅली काढून घरोघरी भिक्षा मागण्यात आली. या अं तर्गत ग्रामस्थांनी ४ हजार ३९२ रुपयाचा लोक वर्गणी गोळा केली. रॅलीतील प्रकाश गवळीकर यांनी धारणकेलेली संत गाडगेबाबाची वेशभुषा ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती या रॅलीत गाकवरी, विद्यार्थी, ग्राम पंचायत सरपंच, उपसपरंच, तसेच जिल्हा परिषद शाळा, तसेच बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश होता गोळा झालेल्या निधीतून जेसीबी मशीनसाठी डिझेलची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात माजी नायब तहसिलदार जाधव, पाणी फउंडेशनचे प्रशिक्षक दिलीप देवतळे, सुरज देशमुख, गोरख बढे, तालुका समन्वयक शाम सवई, प्रफुल्ल बानगावकर, आदींचाही सहभाग होता. काकडशिवणीच्या ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वांंकडून कौतूक करण्यात येत आहे.