भर जहागीर सर्कलमध्ये पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:32+5:302021-06-29T04:27:32+5:30

भर जहागीर जिल्हा परिषद सर्कलमागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडे होती. काॅंग्रेसचा या सर्कलमध्ये अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता, ...

Aspirants for by-elections in Bhar Jahagir Circle | भर जहागीर सर्कलमध्ये पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर

भर जहागीर सर्कलमध्ये पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर

Next

भर जहागीर जिल्हा परिषद सर्कलमागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडे होती. काॅंग्रेसचा या सर्कलमध्ये अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता, तर जनविकास आघाडीला येथील मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर फेकले होते. जिल्हा परिषदेच्या मागील दीड वर्षात विकासकामांना म्हणावी तशी गती मिळाली नव्हती. कारण दोन्ही टप्प्यात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे विकासकामातील विविध गावांतील पांदण रस्ते, मोरगव्हाणवाडी रस्ता, मोप ते बोरखेडी रस्ता, गणेशपूर ते रिसोड रस्ता, भर जहागीर ते मोरगव्हाण सिंचन तलाव रस्त्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. या सर्व विकासकामांचा अजेंडा परत प्रचारामध्ये घेऊन इच्छुक उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रचाराला सामोरे जावे लागणार आहे. भर जहागीर जिल्हा परिषद सर्कलमधील मोरगव्हाणवाडी, चाकोली-कन्हेरी, मोप, बोर-खेडी, शेलुखडसे, गणेशपूर पाचांबा, मांगवाडी आदी गावांचा समावेश होत असून, या सर्कलमधील १४,६९५ मतदार आपल्या मतांचा हक्क बजावणार आहेत. या सर्कलमध्ये मागील अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासह विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. मांगवाडी, भर जहागीर, मोरगव्हाणवाडी, चाकोलीसह आदी गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप संपली नाही आणि निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या डोअर टु डोअर भेटीगाठींना प्रारंभ झालेला दिसत आहेे; परंतु वरिष्ठस्तरावरून युती होणार की नाही किंवा सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार का, हा प्रश्न येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Web Title: Aspirants for by-elections in Bhar Jahagir Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.