अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 05:56 PM2018-08-24T17:56:01+5:302018-08-24T17:57:16+5:30
मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी निधन झाले. अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाºया वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांचा अस्थीकलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी फिरविण्यात येत आहे. ही अस्थीकलश यात्रा शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी मालेगाव येथील जुन्या बसस्थानकावर दुपारी ४ वाजता दाखल झाली. यावेळी मालेगाव तालुक्यातील सर्व अटल बिहारी वाजपेयी यांचे चाहते, सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी त्यांच्या अस्थीकलशाच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यावेळी एका रथावर अस्तिकलश ठेवण्यात आले होते समोर भजनी मंडळी भजन म्हणत होती त्यावेळी चैनसुख संचेती आ विजय जाधव आ राजेन्द्र पाटनी डॉ विवेक माने राजू पाटिल राजे वामनराव सानप गोपाल पाटिल राऊत, शामसुंदर मुंदडा सीताराम लटुरिया, प्रेम भुतडा, गोविंद लाहोटी, रामबाबू मुंदडा, प्राध्यापक गायकवाड, प्राध्यापक भरत आवाळे, मारोतराव लादे , संतोष तिखे, कन्हैया बिरला, कचरूलाल वर्मा, आदिंची उपस्थिती होती.