अटल विश्वकर्मा योजनेत साडेपाच हजार कामगारांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:39 PM2018-08-11T17:39:51+5:302018-08-11T17:40:47+5:30
वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली. दरम्यान, या योजनेत वाशिम जिल्ह्यातील साडेपाच हजार कामगारांना सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी पी.आर. महल्ले यांनी ११ आॅगस्ट रोजी दिली.
शासनाने पंतप्रधान आवास योजनेत बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्यासोबतच ते व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना २ जून २०१७ पासून लागू केली. याशिवाय अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक सहाय्य, आर्थिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचा लाभ दिला जाणार आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पहिली ते सातवी, ७५ टक्के उपस्थिती असल्यास प्रतिवर्षी अडीच हजार, आठवी ते दहावी पाच हजार, दहावी, बारावीत ५० टक्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केल्यास १० हजारांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक मदत केली जाणार आहे. दरम्यान, योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असून त्यात सहभागी होण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांनी कार्यालयीन वेळेत सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पी.आर. महल्ले यांनी केले आहे.