बालवैज्ञानिक परीक्षेत हॅपी फेसेसच्या अथर्व भुतडाची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:18+5:302021-04-03T04:38:18+5:30

डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीमध्ये स्थानिक हॅपी फेसेस द काॅसेंप्ट स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी अथर्व प्रवीण भुतडा याने ...

Atharva ghosts of happy faces in pediatric exams | बालवैज्ञानिक परीक्षेत हॅपी फेसेसच्या अथर्व भुतडाची भरारी

बालवैज्ञानिक परीक्षेत हॅपी फेसेसच्या अथर्व भुतडाची भरारी

Next

डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीमध्ये स्थानिक हॅपी फेसेस द काॅसेंप्ट स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी अथर्व प्रवीण भुतडा याने यश संपादन केले असून राज्यातून प्रथम दहामध्ये स्थान पटकाविल्यामुळे तिसऱ्या फेरीतील मुलाखतीसाठी पात्र ठरला आहे.

मार्च महिन्यामध्ये ही स्पर्धा पार पडली होती.

सदर परीक्षेच्या दुसऱ्या फेरीकरिता हॅपी फेसेसच्या एकूण ४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अथर्व भुतडा याने विज्ञान विषयातील भौतिकशास्त्र,

रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील विविध प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण करून त्यावर आधारित विविध प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यामुळे अथर्व याने महाराष्ट्र राज्यातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावत तिसऱ्या फेरीत होणाऱ्या मुलाखत व शोधनिबंध सादरीकरणासाठी यश मिळविले आहे. या स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये अथर्वने सरासरी ४५ गुण मिळविले असून त्याचा वैज्ञानिक शोधनिबंधही तिसऱ्या फेरीत सादर होणार आहे. डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा ही देशाची भावी वैज्ञानिक घडवीणारी अत्यंत कठीण परीक्षा असून त्यात विविध चाळणी परीक्षेद्वारे व टप्प्यातून विद्यार्थ्यांची निवड होत असते. महाराष्ट्र सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई मार्फत ही परीक्षा वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांकरीता दरवर्षी घेण्यात येत असते. महाराष्ट्रातील एकुण प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी फक्त ७.५ टक्के विद्यार्थींच या परीक्षेसाठी पात्र ठरत असतात ,त्यामुळे हॅपी फेसेसच्या अथर्व भुतडा याने शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला असे गौरवोद्गार शाळेचे संचालक दिलीप हेडा यांनी काढले. यावेळी हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कूलचे संचालक दिलीप हेडा, प्राचार्य सिध्दार्थ चौबे, विज्ञान शिक्षक प्रवीण नसकरी,विपीन सोने व सारिका मस्के यांनी अथर्व भुतडाचा सत्कार केला.

Web Title: Atharva ghosts of happy faces in pediatric exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.