केनवड येथे ‘एटीएम’ फोडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:52 PM2019-01-18T17:52:08+5:302019-01-18T17:53:05+5:30
शिरपुर जैन (वाशिम) : मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे ‘एटीएम’ १७ जानेवारीच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडले. ए
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपुर जैन (वाशिम) : मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे ‘एटीएम’ १७ जानेवारीच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडले. एटीएममधून नेमकी किती रक्कम लंपास झाली, याचा शोध बँक व पोलीस यंत्रणा घेत आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया केनवड येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळच एटीएम आहे. हे एटीएम १७ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. ही घटना १८ जानेवारीला सकाळी उघडकीस आली. शिरपूर पोलीस या घटनेचा पंचनामा करीत असून त्यातील किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली याची माहिती समोर आली नाही. दरम्यान एटीएममध्ये ३७ हजार रुपये अडकून असल्याने ती रक्कम चोरट्यांना लंपास करता आली नाही. घटनास्थळावर श्वानपथक व फिंगर तज्ज्ञांना पाचारण केले होते. मात्र, वृत्त लिहिस्तोवर कोणताही सुगावा लागला नव्हता.