शालेय पोषण आहार अपहाराचा प्रयत्न

By admin | Published: December 18, 2014 01:08 AM2014-12-18T01:08:26+5:302014-12-18T01:08:26+5:30

मालेगाव पोलिसांच्या धाडीत उघडकीस आला प्रकार.

An attempt to kidnap school nutrition | शालेय पोषण आहार अपहाराचा प्रयत्न

शालेय पोषण आहार अपहाराचा प्रयत्न

Next

मालेगाव (वाशिम): येथील जुन्या बसस्थानकानजीक एका दुकानात शालेय पोषण आहाराचे धान्य वाहनातून उतरविल्या जात असल्याच्या माहितीवरून मालेगाव पोलिसांनी धाड टाकून पकडल्याची घटना १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. मालेगाव येथील जुन्या बसस्थानकानजीक गोपाल काबरा यांच्या दुकानामध्ये पोषण आहाराचा माल उ तरविल्या जात असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना खबरीकडून मिळाली. या माहितीवरून मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार तट यांच्या चमूने घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर पोलीस पोहचल्यानंतर तेथे तांदुळाचे १९ पोते दुकानात उतरविताना आढळून आले. यावेळी सदर माल आपला नसून, सदर माल उ तरवून घेण्यासंदर्भात मला एका जणाचा फोन आला होता. म्हणून उतरवित असल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. पोलिसांनी याबाबत महसूल विभागाला कळविले असून, वृत्त लिहिस्तोवर पोलिसांचा पंचनामा सुरू होता.

Web Title: An attempt to kidnap school nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.