साधूच्या वेशात धार्मिक विधीच्या नावे लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:06+5:302021-06-26T04:28:06+5:30
रुई येथे शुक्रवारी सकाळी एका चारचाकी वाहनाने साधू महाराजांच्या वेशातील काही लोक दाखल झाले. त्यांनी गावातील देवानंद गोदमले यांच्या ...
रुई येथे शुक्रवारी सकाळी एका चारचाकी वाहनाने साधू महाराजांच्या वेशातील काही लोक दाखल झाले. त्यांनी गावातील देवानंद गोदमले यांच्या घरी जाऊन पूजा होम, हवन करीत त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले. गावातील काही युवकाच्या लक्षात येताच. त्यांनी त्या महाराज लोकांची गाडी चौकात अडवून विचारणा केली. त्यावेळी त्या महाराजांनी समाधानकारक उत्तर दिली नाहीत. मिळाल्याने महाराजांच्या वेशातील या संशयित व्यक्तींना ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन असेगाव पोलीस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. युवकाच्या सर्तकतेमुळे मोठी फसवणूक थांबी आहे. या संदर्भात आसेगाव पोलीस स्टेशनकडून माहिती घेतली असता संबंधितांवर प्रथम खबरी नोंद दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून, मारहाण झालेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी आणि गावातील नागरिकांची बयाण नोंदविण्याचे काम चालू असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. गोदमले यांचेकडून रक्कम घेऊन पोबारा करणाऱ्या महाराजांना वेळीच पकडण्यात आल्याने ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक वाचल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी अशा बुवांपासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.