निवडणुक आटोपली, आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 12:07 PM2021-01-21T12:07:21+5:302021-01-21T12:07:29+5:30

Gram Panchayat Election जिल्हाधिकाऱ्यांकडून आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केव्हा होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.  

Attention to the reservation of Sarpanch |  निवडणुक आटोपली, आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष 

 निवडणुक आटोपली, आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, आता सरपंच पदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर एका महिन्याच्या आत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढणे बंधनकारक असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केव्हा होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.  
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. दरवेळी निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत होती. यंदादेखील आरक्षण सोडत काढण्यात आली; परंतु त्यानंतर ग्रामविकास विभागाने ही सोडत रद्द करीत निवडणुकीनंतर आरक्षण सोडत काढण्याचे जाहीर केले होते. 
निकालानंतर एका महिन्याच्या आत  सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. १८ जानेवारी रोजी निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दरम्यान, सरपंच पद मिळावे म्हणून इच्छुकांनी पॅनल व आघाडी प्रमुखांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. 
 
काही जण म्हणतात, पूर्वीचेच आरक्षण राहावे !
निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी जिल्हा स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आरक्षणानुसार अनेकांनी सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणुकीची तयारी केली; मात्र अल्पावधीतच आरक्षण सोडत रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. ‘रोटेशन’ पद्धतीने आरक्षण सोडत निघत असल्याने अनेक ठिकाणी पूर्वीचेच आरक्षण कायम राहील, असा दावा काहींनी केला तर आरक्षण सोडतीत बदल होईल, असा अंदाज काहींनी वर्तविला.

निवडणूक निकालानंतर एका महिन्याच्या आत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढावी, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
- सुनील विंचनकर
उपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम

Web Title: Attention to the reservation of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.